कोल्हापूर दि. २६ : सहकार, संसदीय कार्य मंत्री व जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०११ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली आहे. समितीच्या सदस्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
या बैठकीत २६ जून २०११ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तांतास मान्यता देणे व कार्यवाही अहवालावर चर्चा करणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०१२-१३ च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे, (अ) सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना (ब) अनुसूचित जाती उप योजना (विशेष घटक योजना) व (क) आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासी योजना., जिल्हा वार्षिक योजना सन २०११-१२ च्या दि. १५ डिसेंबर २०११ अखेर प्रगतीचा आढावा घेणे. जिल्हा वार्षिक योजना सन २०११-१२ पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे व अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळच्या विषयावरही बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.