शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

वाहनांवर २६१२ केसेस २ लाख ६२ हजार रुपयांचे शुल्क वसूल

          कोल्हापूर दि. १ : कोल्हापूर शहरामध्ये मोटार वाहनांना विहित नमुन्यात नंबर प्लेट न लावणार्‍या मोटार वाहन चालकांविरुध्द कोल्हापूर शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्यावतीने चालू आर्थिक वर्षात २ हजार ६१२ केसेस दाखल करुन २ लाख ६२ हजार ७०० रुपयांचे तडजोड शुल्क वसुल करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दिली.
      मोटार वाहन चालवित असताना आपल्या मोटार वाहनांची नंबर प्लेट विहित नमुन्यात लावणे बंधनकारक असून याबाबत मोटार वाहन कायद्यामध्ये दंडात्मक तरतूद आहे. यापुढेही  नियमबाह्य नंबर प्लेट लावलेल्या वाहन चालकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने कोल्हापूर शहरातील मोटार वाहन चालकांनी आपल्या वाहनाची नंबर प्लेट विहीत नमुन्यात लावून सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.