कोल्हापूर दि. १ : कोल्हापूर जिल्ह्यात सन २००८ ते माहे नोव्हेबर २०१० या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, महापूर, अवेळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिके व फळपिकांचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्यांना शासन निर्णयानुसार देय असलेल्या मदतीचे वाटप कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. कोल्हापूर यांच्यामार्फत सुरु आहे.
तथापि कांही शेतकर्यांचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सेव्हिंग खाते नसल्याने तसेच बँकेत सेव्हिंग खाते आहे, परंतु केवायसी पुर्तता नसल्याने बँकेस मदत वाटप करण्यास अडचणी येत आहेत. ज्या शेतकर्यांचे सन २००८ ते २०१० या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे / फळ पिकांचे नुकसान झाले असेल अशांनी आपले नाव पंचनाम्याच्या यादीमध्ये असेल तर आपल्या नजिकच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संपर्क साधून मदतीची रक्कम घ्यावी. तसेच बँकेस काही कागदपत्रांची आवश्यकता असल्यास त्याची पुर्तता करुन मदतीची रक्कम घ्यावी.
अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. कोल्हापूर (प्रधान शाखा / मुख्य शाखा), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकार्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.