कोल्हापूर दि. २१ : आंतरराज्य युवा मंडळ आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याच्या भेटीवर आलेल्या आंध्र प्रदेशच्या वीस युवकांचे आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. श्री. धुळाज यांनी यावेळी कोल्हापूर जिल्ह्याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांस्कृतिक, ऐतिहासिक, औद्योगिक, सहकार, कला, क्रीडा, कृषि अशा सर्व क्षेत्राबाबतची सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी सुनंदा गायकवाड, तहसिलदार संगीता चौगुले, तहसिलदार संगीता तावदारे, तहसिलदार गुरु बिराजदार, नायब तहसिलदार सरस्वती पाटील, अश्विनी वरुटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नेहरु युवा केंद्गाचे समन्वयक भगवान गवई यानी केले.
भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय अंतर्गत चालत असलेल्या नेहरु युवा केंद्ग कोल्हापुरच्यावतीने दि. १९ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०११ पर्यंत आंतरराज्य युवा मंडळ आदान-प्रदान कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये आंध्र प्रदेशातील नेहरु युवा केंद्ग, सिध्दीपेठ येथील वीस युवक कोल्हापुरात आले आहेत. हे युवक पन्हाळा तालुक्यातील सावर्डे येथील भगतसिंह तरुण मंडळाकडे राहणार आहेत व तेथे राहून कोल्हापूर जिल्ह्यातील युवा मंडळे कशाप्रकारे कार्य करतात, शासनाच्या योजनांचा कसा फायदा घेतात, युवक मंडळे त्यांचा आर्थिक व्यवहार कशाप्रकारे ठेवतात, बैठका, कार्यक्रम कसे आयोजित करतात याचा मागोवा घेणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा सामाजिक विकास कसा झाला याचा अभ्यास करणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.