बुधवार, ७ डिसेंबर, २०११

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. ७ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज ७ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. ७ डिसेंबर रोजी रात्रौ ७-३० वाजता तासगाव, जि. सांगलीहून इचलकरंजीतील घोरपडे नाट्यसभागृह समोरील चौक येथे आगमन व इचलकरंजी येथील नगरपालिका निवडणूक प्रचार सभेस उपस्थिती. कार्यक्रमानंतर मोटारीने शासकीय विश्रामगृह, कोल्हापूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
      दि. ८ डिसेंबर २०११ (संभाव्य कार्यक्रम) शासकीय विश्रामगृह येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण, आगमन व मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.