सोमवार, ५ डिसेंबर, २०११

अन्न पदार्थ व्यावसायिकांना परवाना घेण्याचे आवाहन

          कोल्हापूर दि. ५ : संपूर्ण देशात ५ ऑगस्ट २०११ पासून अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६ व नियम २०११ लागू झाला आहे. या कायद्यात विविध सात प्रकारचे अन्न पदार्थांविषयीचे कायदे विलीन करण्यात आले आहेत. त्यानुसार विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी परवाना घेणे किंवा नोंदणी करणे बंधनकारक आहे. जुन्या कायद्यानुसार परवाना घेतलेल्या महानगरपालिका क्षेत्रातील व संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांनी सदर परवान्याचे नूतनीकरण किंवा नवीन परवान्यात रुपांतर ३१ डिसेंबर २०११ पर्यंत करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यामध्ये खालीलप्रमाणे विविध ठिकाणी परवाना नोंदणी शिबीर आयोजित केलेले आहे. नूतनीकरणासाठी सध्या फक्त जुना अन्न परवाना (मूळ परवाना व नूतनीकरण परवाना) हमीपत्र, ओळखीबाबत पुरावा (पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/आधार कार्ड झेरॉक्स प्रत) रेशनकार्ड झेराक्स प्रत आणि नवीन कायद्यानुसार फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व अन्न पदार्थ उत्पादक विक्रेत्यांनी ३१ डिसेंबर २०११ पर्यंत नूतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पदावधित अधिकारी आणि परवाना प्राधिकारी अन्न व औषध प्रशासन यांनी केले आहे.
      दिनांकापुढे तालुक्याचे नाव व कॅम्पचे ठिकाण दर्शविण्यात आले आहे. दि. ६ डिसेंबर रोजी कोल्हापूर कार्यालय, दि. ७ डिसेंबर रोजी पन्हाळा - वारणा, कोडोली, हातकणंगले - इचलकरंजी. दि. ८ डिसेंबर रोजी हातकणंगले, शिरोळ व पन्हाळा तालुक्यातील कळे. दि. ९ डिसेंबर रोजी कोल्हापूर कार्यालय, दि. १० डिसेंबर रोजी हातकणंगले - इचलकरंजी. दि. १२ डिसेंबर रोजी पन्हाळा, आजरा व हातकणंगले तालुक्यातील हुपरी. दि. १३ डिसेंबर रोजी कागल व  शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, दि. १४ डिसेंबर रोजी करवीर - वडणगे, हातकणंगले - माणगांव, दि. १५ डिसेंबर रोजी गडहिंग्लज - महागांव, दि. १६ डिसेंबर रोजी शिरोळ - कुरुंदवाड, करवीर - गांधीनगर, दि. १७ डिसेंबर शाहुवाडी - मलकापूर, दि. १९ डिसेंबर रोजी करवीर - उचगांव, कागल - मुरगूड, दि. २० डिसेंबर रोजी गडहिंग्लज, दि. २१ डिसेंबर रोजी हातकणंगले - वडगांव, कागल - बिद्गी, दि. २२ डिसेंबर रोजी शाहुवाडी - सरुड, दि. २३ डिसेंबर रोजी राधानगरी - सरवडे परिसर, दि. २४ डिसेंबर रोजी कोल्हापूर कार्यालय, राधानगरी - वाळवा, दि. २५ डिसेंबर रोजी कोल्हापूर कार्यालय, दि. २६ डिसेंबर रोजी राधानगरी व भुदरगड तालुक्यातील कूर, दि. २७ डिसेंबर रोजी राधानगरी - भोगावती कारखाना, शिरोळ - जयसिंगपूर आणि चंदगड - कोवाड, दि. २८ डिसेंबर रोजी गगनबावडा व हातकणंगले - इचलकरंजी, दि. २९ डिसेंबर रोजी गडहिंग्लज - नेसरी आणि दि. ३० डिसेंबर रोजी शाहुवाडी - आंबा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.