शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

विज्ञान माहितीपट महोत्सवाचे शिवाजी विद्यापीठात उद्‌घाटन

 कोल्हापूर दि. ९ : शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष व आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्षानिमित्त दुसर्‍या विज्ञान माहितीपट महोत्सवाचे उद्‌घाटन आज येथे झाले.
 कार्यक्रमाचे उद्‌घाटन त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. 
डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, 'विज्ञान आपल्या दारी हा जो उपक्रम सुरु केला आहे तो समाजाला उपयुक्त आहे.१०० माहितीपट तयार करण्याचा केलेला संकल्प कौतुकास्पद आहे.विज्ञानातील संशोधनाची माहिती समाजापर्यत पोहोचण्यासाठी असा उपक्रम राबविण्याची गरज आहे. एच. आय. व्ही.  एडस संदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे.'
स्वागत व प्रास्ताविक शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांनी केले. तर रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस आर. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. जी. बी. कोळेकर व  डॉ. बी. एस. मोहिते यांनी मनोगते व्यक्त केली.  डॉ. पी. व्ही.अनभुले यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. ए. बी. राजगे, डॉ. बी. एम. हिर्डेकर, श्री. बी. एस. पाटील व शिवाजी विद्यापीठाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.