शनिवार, ३ डिसेंबर, २०११

नगरपरिषदेसाठी ११ डिसेंबर रोजी मतदान मतमोजणी १२ डिसेंबरला होणार

कोल्हापूर दि. ३ : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ५ मधील ४ जागा वगळता सर्व ९ नगरपरिषदेसाठी ११ डिसेंबर २०११ रोजी मतदान घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज दिली. मतमोजणी १२ डिसेंबर २०११ रोजी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील जागा क्रमांक ५अ व ५क मधील उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे जात पडताळणी पत्राअभावी फेटाळल्याने जिल्हा  न्यायालयात  दाखल झालेल्या अपीलांची सुनावणी दि. २ डिसेंबर २०११ रोजी सायंकाळी पूर्ण झाली आहे. या अपीलावर सोमवार दि. ५ डिसेंबर २०११ रोजी निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील ४ जागा वगळून जयसिंगपूर नगरपरिषदेच्या उर्वरित ५ प्रभागासह कोल्हापूर जिल्हयातील इतर ८ नगरपरिषदांसाठी मतदान दि. ११ डिसेंबर २०११ रोजी ठेवण्यात येत असून मतमोजणी दि. १२ डिसेंबर २०११ रोजी घेण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.