कोल्हापूर दि. ५ : नगरविकास, वने, बंदरे, खार जमीन, संसदीय कार्य, क्रीडा व युवक कल्याण व माजी सैनिकांचे कल्याण खात्यांचे राज्यमंत्री भास्कर जाधव दि. ६ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. ६ डिसेंबर २०११ रोजी दुपारी २ वाजता चिपळूणहून शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व ४ वाजेपर्यंत राखीव. ४ ते ५ वाजेपर्यंत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी. ५ वाजता इचलकरंजीकडे प्रयाण. सायं. ५-३० वाजता इचलकरंजी येथे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आयोजित केलेल्या इचलकरंजी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०११ च्या अनुषंगाने प्रचारार्थ सभेस उपस्थिती. सोयीनुसार चिपळूणकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.